कापूस सोयाबीन अनुदान कुठे अडकले शेतकऱ्यांना कधी मिळणार 5000 रूपये
कापूस सोयाबीन अनुदान ; गेल्या हंगामात पडलेल्या बाजारभावामुळे तसेच दुष्काळामुळे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटांना सामोरे जावे लागले होते या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी भावांतर योजनेची घोषणा केली व नंतर दोन हेक्टर मर्यादेत हेक्टरी 5000 देण्याचे जाहीर केले. या अनुदान वितरण प्रणाली साठी एक स्वतंत्र पोर्टल विकसित केले तसेच शेतकऱ्यांना आधार संबंधित डाटा वापरण्याचे सहमती पत्र व अर्ज भरून घेतले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कापूस आणि सोयाबीन चे अनुदान 21/ऑगस्ट रोजी वितरणाला सुरू होईल तर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी 10/सप्टेंबर रोजी अनुदान वितरण सुरू होईल असे सांगितले होते पण या दोन्ही तारखांना अनुदान वितरण सुरू झालेले नाही. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये कापूस सोयाबीन अनुदानावर चर्चा सुरू आहे पण खात्यात अनुदान येईलच याची शेतकऱ्यांना खात्री नाही असे गावपातळीवर चर्चेदरम्यान दिसून येत आहे.
कापूस सोयाबीन अनुदान कुठे अडकले ?
राज्य सरकारने कापूस सोयाबीन अनुदान वितरणाची प्रक्रिया निश्चित केली असून कृषी आयुक्तांच्या नावे एक स्वतंत्र बॅंक खाते उघडण्यात आले. तसेच शेतकऱ्यांची माहिती भरण्यासाठी सरकारने एक स्वतंत्र पोर्टल विकसित केले पण अजूनही या पोर्टल वर शेतकऱ्यांची माहिती भरणे सुरू आहे.
सोयाबीन आणि कापूस अनुदान च्या एकुण निधी पैकी 60% निधी मंजूर केला असून आतापर्यंत माहिती भरलेल्या 13 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान जमा करण्याचे आदेश कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले होते. परंतु अद्याप हे अनुदान कधी वाटप सुरू होईल याबाबत काही स्पष्ट दिसत नाही.
कापूस सोयाबीन अनुदान वाटपाबाबत पुढे काही नवीन माहिती मिळाली तर आम्ही तुमच्या पर्यंत नक्की पोहचवण्याचा पर्यंत करु तरी शेतीविषयक नवनवीन माहिती, हवामान अंदाज, बाजारभाव, शेती सल्ला व इतर महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या whatsaap ग्रुपमध्ये सामिल व्हा.. धन्यवाद