माणिकराव खुळे – सप्टेंबरमध्ये सरासरी पेक्षा अधिक पावसाचा अंदाज

माणिकराव खुळे – सप्टेंबरमध्ये सरासरी पेक्षा अधिक पावसाचा अंदाज

माणिकराव खुळे – जेष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी सप्टेंबरमध्ये पाऊस कसा राहिल याबाबत अंदाज व्यक्त केला आहे. येत्या काही दिवसांत खरिपातील पिकाची काढणी सुरू होईल यादरम्यान शेतकऱ्यांना उघडिपीची गरज आहे. जर सप्टेंबरमध्ये पाऊस लागुन राहिला तर खरिपातील पिकांचे मोठे नुकसान होईल. तसेच ला-निना स्थिती कशी असेल याबाबत विस्तृत माहिती माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे.

 

सप्टेंबरमध्ये हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव, नगर, सोलापूर जिल्ह्यात सरासरी पेक्षा कमी तर उंचीच्या महाराष्ट्रात सप्टेंबरमध्ये सरासरी पेक्षा अधिक म्हणजेच 109 % पावसाची शक्यता आहे. एकंदरीत राज्यात 96 ते 104 % पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. अनेक ठिकाणी खरिपातील पिकांची काढणी करण्यास अडचणी येऊ शकते.

 

सप्टेंबरमध्ये या जिल्ह्यात सरासरी पेक्षा अधिक पाऊस – माणिकराव खुळे

माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईसह संपूर्ण कोकण मराठवाड्यात अती जोरदार पावसाचा अंदाज आहे. यादरम्यान विदर्भात पावसाचा जोर कमी असेल. कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर-मध्य महाराष्ट्र दि. 12/ ते 16/सप्टेंबर दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज आहे.

दि. 16/ ते 30/सप्टेंबर या दोन आठवड्यातील पाऊस ला निना च्या विकासावर अवलंबून असेल. तरी एकंदरीत सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस होईल माणिकराव खुळे.

 

परतीचा पाऊस कधी पासून सुरू होईल – माणिकराव खुळे

खुळे यांनी सांगितलेल्या माहितीनुसार 17/सप्टेंबर पासून परत फिरण्यास सुरूवात होते. त्यानंतर 19 दिवसात महाराष्ट्राच्या वेशीपर्यंत येतो आणि पुढे पाच दिवसात महाराष्ट्रातुन निघून जातो. हवामान खात्याने जाहीर केल्यानंतर परतीच्या पावसाबाबत सविस्तर अंदाज दिला जाईल असे खुळे यांनी सांगितले.

 

हे वाचा – नुकसान भरपाई ; या शेतकऱ्यांना मिळणार 40 हजार रुपयांपर्यंत मदत

 

https://hello.maharashtra-live.com/नुकसान-भरपाई/ ‎

 

Leave a Comment

Close Visit hello.maharashtra-live