ला निना चा प्रभाव सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये जोरदार – मान्सूनचा मुक्काम लांबणीवर

ला निना चा प्रभाव सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये जोरदार – मान्सूनचा मुक्काम लांबणीवर

 

ला निना ; देशात मान्सूनचे आगमन जुन मध्ये होते तसेच सप्टेंबर मध्ये मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होतो. परतीचा मान्सून संपूर्ण देशातून जाण्यासाठी 15/ऑक्टोबर पर्यंत कालावधी लागतो. हवामान तज्ञांनी यंदा परतीचा मान्सूनचा प्रवास राजस्थान मधुन कधी सुरू होणार तसेच राज्यातून कधी निघून जाणार याबाबत माहिती दिली आहे पाहुया परतीचा मान्सून बाबत संपुर्ण अंदाज..

भारतीय हवामानाच्या अंदाजानुसार ला निना च्या प्रभावाने निर्माण होणाऱ्या कमी दाबामुळे सप्टेंबर च्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मोठ्या प्रमाणावर पावसाचा अंदाज आहे. तसेच ला निना च्या प्रभावामुळे परतीच्या मान्सूनला सुद्धा उशीर झाला आहे. परतीचा मान्सून यंदा लांबणीवर असल्याचे हवामान तज्ञांकडून सांगितले जात आहे.

 

परतीचा मान्सून लांबणीवर का – हवामान तज्ञ 

हवामान तज्ञांकडून दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबर मध्ये तिसऱ्या आठवड्यात कमी दाब निर्माण होणार आहे त्यामुळे मान्सून चा परतीचा प्रवास लांबणार आहे.तसेच ला निना च्या प्रभावामुळे सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे.

 

परतीचा मान्सून लांबल्याने काय परिणाम होणार.. 

परतीचा मान्सून लांबल्याने खरीपातील सोयाबीन कापूस या पिकाच्या काढणीवर परीणाम होणार काढणी वेळात पाऊस सुरू राहिल्याने उत्पादनात मोठी घट होणार तसेच उशिरापर्यंत पाऊस सुरू राहिल्याने रब्बी हंगामातील पिकाच्या पेरणीसाठी त्याच्या काही फायदा होईल आणि पाणी साठ्यात वाढ होईल.

 

30/ऑगस्ट ते 04/सप्टेंबर या कालावधीत मराठवाडा,उत्तर महाराष्ट्र तसेच गुजरात मध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. अचानक झालेल्या अतिवृष्टी मुळे नदीच्या काठावर असलेल्या गावात पुराचे पाणी शिरले व अनेक नदीच्या काठावर असलेल्या घरातील सामान वाहून गेले. तसेच पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

 

Leave a Comment

Close Visit hello.maharashtra-live