अतिवृष्टी नुकसान भरपाई जाहीर या 26 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार…
अतिवृष्टी नुकसान भरपाई ; राज्य सरकारकडून अतिवृष्टी, पुर परीस्थिती, चक्रीवादळ, दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीने नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना पुढील हंगामात उपयोगी पडावे यासाठी निविष्ठा अनुदान दिले जाते. निविष्ठा अनुदान राज्य आपत्ती प्रतीसाद निधीमधून एक वर्षात एकदा दिले जाते. 01/01/2024 च्या शासन निर्णयानुसार नोव्हेंबर 2023 मध्ये झालेली अवेळी गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीने तसेच त्यापुढील कालावधी साठी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना दोन हेक्टर ऐवजी तीन हेक्टर पर्यंत मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे.
दि. 05/सप्टेंबर रोजी घेतलेल्या शासन निर्णयानुसार नोव्हेंबर 2023 ते जुलै 2024 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी, अवेळी पाऊस, गारपीट यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत विभागीय आयुक्तांनी शासनास मदतीसाठी प्रस्ताव पाठवले होते. या प्रस्तावाबाबतीत शासनाने (05/09/2024) रोजी शासन निर्णय निर्गमित करत मदत जाहीर केली आहे.
नुकसान भरपाई बाबतचा शासन निर्णय पहा
नोव्हेंबर, 2023 ते जुलै,2024 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अवेळी पाऊस अतीवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासन निर्णय निर्गमित केला असून सुधारित दरानुसार 307.2529 कोटींचा निधी वितरीत करण्यास मंजूरी दिली आहे.
नोव्हेंबर 2023 ते जुलै 2024 या कालावधीत नुकसान ग्रस्त जिल्ह्यांना 307 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामध्ये 26 जिल्हे पात्र असुन प्रत्येक जिल्ह्यासाठी नुकसान ग्रस्त क्षेत्रानुसार निधी मंजूर केला आहे. तुमच्या जिल्ह्यासाठी किती निधी मंजूर झाला तसेच नुकसान भरपाई बाबतचा शासन निर्णय पहा. तसेच कोणत्या जिल्ह्यासाठी किती नूकसान भरपाई मिळाली हे खाली पहा…
नुकसान भरपाई बाबतचा शासन निर्णय पहा