आनंदाचा शिधा आला ; या लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा मिळणार कधी मिळणार पहा….
आनंदाचा शिधा – सणासुदीच्या काळात राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात खाद्यवस्तू उपलब्ध करून देण्याकरीता राज्यात सन २०२२ च्या दिवाळी, सन २०२३ च्या गुढीपाडवा – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गौरी- गणपती उत्सव व दिवाळी, सन २०२४ च्या श्री राम प्राणप्रतिष्ठा सोहळा – छ. शिवाजी महाराज जयंतीनिमित्त प्रतिशिधापत्रिका १ शिधाजिन्नस संच “आनंदाचा शिधा” वितरीत करण्यात आला आहे.
राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) केशरी शेतकरी अशा एकूण १,७०,८२,०८६ शिधापत्रिका धारकांना “आनंदाचा शिधा” गौरी-गणपती उत्सवानिमित्त वितरीत करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे.
गौरी-गणपती उत्सवानिमित्त प्रत्येकी एक किलो रवा, एक किलो चनाडाळ, एक किलो साखर आणि एक लिटर सोयाबीन तेल या वस्तूचा समावेश असलेला आनंदाचा शिधा प्रत्येक शिधापत्रिका धारकांना एक संच २५ ऑगस्ट २०२४ ते १५ सप्टेंबर, २०२४ या १ महिन्याच्या कालावधीत ई- पॉस प्रणालीद्वारे १०० रुपयांत वितरीत करण्यात येणार आहे.
हे वाचा – रेशन कार्डमधुन ऑनलाईन नाव करा फक्त दोन मिनिटांत (ॲप्लिकेशन डाऊनलोड करा)
Ration card news ; दोन मिनिटांत ऑनलाइन शिधापत्रिकेवरील नाव कमी करा