कापूस सोयाबीन अनुदान ; या तारखेला खात्यात जमा होणार पंतप्रधान मोदींच्या हस्ते

कापूस सोयाबीन अनुदान ; या तारखेला खात्यात जमा होणार पंतप्रधान मोदींच्या हस्ते

कापूस सोयाबीन अनुदान ; सन 2023 मध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5000 रुपये दोन हेक्टर मर्यादेत अनुदान दिले जात आहे. या अनुदानासाठी शेतकऱ्यांना 21/सप्टेंबर पर्यंत संमती पत्र, आधार कार्ड, ना हरकत प्रमाणपत्र आपल्या गावातल्या कृषी सहाय्यकाकडे जमा करण्याचे आवाहन केले आहे.

आतापर्यंत भरपूर शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यकाकडे आधार कार्ड, संमती पत्र जमा केले आहे आणि या शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. कापूस आणि सोयाबीन अनुदान वाटपाची तारिख सरकारने निश्चित केली आहे.

कापूस सोयाबीन अनुदान

 

यापुर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 21/ऑगस्टपासुन कापूस सोयाबीन अनुदान वितरण सुरू होईल असे सांगितले होते तसेच कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी 10/सप्टेंबर पासून अनुदान वितरण सुरू होईल असे सांगितले होते परंतु या अनुदानाचे अद्यापही वितरण सुरू झालेले नाही. 19/सप्टेंबर रोजी कृषी विभागाने तसेच कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार 26/सप्टेंबर पासून सुरू होईल असे सांगितले आहे.

 

मागील वर्षी आर्थिक नुकसान झालेल्या कापूस-सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5 हजार प्रमाणे द्यावयाच्या मदतीची कार्यपद्धती आज मंत्रालयात संबंधित अधिकाऱ्यांच्या समवेत बैठक घेऊन अंतिम करण्यात आली. याद्वारे सुमारे 91 लाख हेक्टरवरील 83 लाख शेतकऱ्यांना 4192 कोटी अनुदान वितरित केले जाईल. या अनुदानाचे वितरण देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्याचे नियोजन केले जात आहे. तत्पूर्वी याबाबतच्या सर्व तांत्रिक बाबी पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. (कृषीमंत्री धनंजय मुंडे महाराष्ट्र राज्य)

 

Leave a Comment

Close Visit hello.maharashtra-live