पंजाबराव डख लाईव्ह ; परतीचा पाऊस या तारखेपासून सुरू होणार…
पंजाबराव डख लाईव्ह ; हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दि. 05/सप्टेंबर रोजी नवीन अंदाज वर्तवला आहे. या अंदाजात त्यांनी पुढील आठवडाभराचा अंदाज तसेच परतीचा पाऊस कधी सक्रिय होणार याबाबत सविस्तर माहिती दिली आहे पाहुया या आठवड्याचा अंदाज तसेच परतीचा पाऊस कधी सुरू होणार. (पंजाबराव डख लाईव्ह)
आज या भागात पावसाचा अंदाज – पंजाबराव डख
आज दुपारनंतर हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, लातूर, नगर, नाशिक, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशीमवाशीम या जिल्ह्यात भाग बदलत विखुरलेल्या स्वरूपात विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज आहे.
या भागात पावसाची उघडीप राहिल – पंजाबराव डख
पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार लातूर, धाराशिव, या भागात पावसाचा जोर कमी होणार आहे अगदी विखुरलेल्या स्वरूपात पाऊस पडेल तरी शेतकऱ्यांनी उडीद तसेच काढणीला आलेले सोयाबीन काढण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. तरी पिकाची काढणी दुपारपर्यंत करून दुपारनंतर काढलेले पिक झाकून ठेवावे असे पंजाबराव डख यांनी सांगितले आहे.
पाऊस परतीचा प्रवास कधी सुरू करणार – पंजाबराव डख
पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार राजस्थान मधुन पाऊस परतीचा प्रवास 20/सप्टेंबर पासून सुरू होण्याची शक्यता आहे. परतीचा प्रवास 20/सप्टेंबर ला सुरू होणार असला तरी महाराष्ट्रातून मान्सून जायला उशीर होणार आहे. सप्टेंबर मध्ये जोरदार पावसाचा अंदाज असल्याचे सांगितले जात आहे.