रविकांत तुपकर ; तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन तात्पुरते स्थगित पवारांबरोबर बैठक…
रविकांत तुपकर ; शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी विविध मागण्यासाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. राज्य सरकारने या आंदोलनाची दखल घेतली असून बैठकीसाठी तुपकरांना मुंबईला येण्याचे निमंत्रण दिले आहे. राज्य सरकारने आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी बैठक बोलावली असल्याने शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी तात्पुरते अन्नत्याग आंदोलन स्थगित केले आहे.
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सह शेतकरी, शेतकरी नेते यांच्या सोबत दि. 11/सप्टेंबर रोजी बैठक होणार आहे. या बैठकीत तुपकर यांच्या मागण्यावर काही तोडगा निघाला तर ठीक नाहीतर रविकांत तुपकर हे पुन्हा रस्त्यावर उतरणार आहे.
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी दि. 11/सप्टेंबर रोजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या सह अनेक शेतकरी नेत्यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. या बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा निघेल हि अपेक्षा आहे.
शुक्रवारी रात्री स्थानिक उपविभागीय अधिकारी यांनी तुपकर भेट घेतली. यावेळी कृषिमंत्री धनंजय मुंडे आणि रविकांत तुपकर यांच्यात फोनवर चर्चा झाली. यावेळी मुंडे फोनवर बोलताना म्हणाले, आंदोलन बंद करा, मुंबईत या. बैठकीत प्रश्न सोडवू, असे आवाहन त्यांनी तुपकर यांना केले. तुमच्या सर्व मागण्या मान्य केल्या जातील, असे आश्वासनही त्यांनी तुपकरांना दिले. आता बैठकीत तुपकर यांच्या मागण्या मान्य झाल्या तर ठीक अन्यथा पुन्हा आंदोलनाचा इशारा तुपकर यांनी दिला आहे.
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या प्रमुख मागण्या..
महाराष्ट्रात सोयाबीन आणि कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. पण शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य भाव मिळत नाही. त्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही. सध्या कापूस व सोयाबीनला उत्पादन खर्चाचा अर्धा भाव देखील मिळत नसल्याची स्थिती आहे. यामुळेच शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यामुळे वेळोवेळी सरकारकडे विनंती करत आंदोलने केली आहे. मात्र सरकार काही लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळेच आता अन्नत्याग आंदोलन करावे लागत आहे – रविकांत तुपकर.