लाडकी बहिण योजनेचे 4500 रूपये कधी आणि कोणाला मिळणार – आदिती तटकरे…

लाडकी बहिण योजनेचे 4500 रूपये कधी आणि कोणाला मिळणार – आदिती तटकरे…

लाडकी बहिण योजना ; यंदा म्हणजे 2024 मध्ये सर्वात लोकप्रिय झालेली योजना म्हणजे लाडकी बहिण योजना. या योजनेअंतर्गत 21 ते 65 या वयोगटातील ज्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न 250000 पेक्षा कमी आहे तसेच ज्यांच्या कुटुंबात नोकरदार नाही अशा महिलांना दर महिन्याला 1500 रूपये याप्रमाणे वार्षिक 18000 रूपये दिले जाणार आहे.

या योजनेतुन महिलांना घरखर्च तसेच मुलांचे शिक्षण व सर्वागीण विकासासाठी काही हातभार लागेल आणि महिलांचे घरातील व समाजातील दर्जा वाढेल या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने ही योजना सुरू केली आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत 1 कोटी 65 लाख महिलांचे अर्ज मंजूर होऊन त्यांना लाडकी बहिण योजनेचे दोन महिण्याचे 3000 रूपये मिळाले आहेत. तसेच काही महिलांना अर्ज अप्रोवल असताना सुद्धा योजनेचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत.

लाडकी बहिण योजनेचे पैसे दोन टप्प्यात मिळुन 01/कोटी 65/लाख महिलांच्या खात्यात जमा झाले आहे तरी ज्या महिलांच्या खात्यात अद्याप लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा झाले नाही अशा महिलांना या महिलांत म्हणजेच सप्टेंबर मध्ये 4500 हजार रुपये मिळतील तसेच ज्या महिलांना 3000 रूपये मिळाले आहेत अशा महिलांना 1500 रूपये मिळतील असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे.

तुमचा लाडकी बहिण योजनेचा अर्ज मंजूर झाला असेल व तुमचे आधार सिडिंग स्टेट्स ॲक्टिव असेल तर तुम्हाला काही करण्याची गरज नाही सप्टेंबर मध्ये तुम्हाला लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा होतील. जर तुमच्या बॅंकेला आधार सिडिंग स्टेट्स ॲक्टिव नसेल तर लवकरात लवकर करुन घ्या. कारण लाडकी बहिण योजनेचे पैसे DBTद्वारे थेट आधार लिंक खात्यात जमा केले जाणार आहे त्यासाठी आधार सिडिंग स्टेट्स ॲक्टिव असने आवश्यक आहे.

तसेच जर कुणाचा नवीन अर्ज भरणे बाकी असेल तर तुमच्या अंगणवाडी सेविका कडे संपर्क करा कारण यापुढे फक्त अंगणवाडी सेविकांना अर्ज भरता येणार आहे.

Leave a Comment

Close Visit hello.maharashtra-live