Dr. Hosalikar ; परतीचा पाऊस कसा राहिल डॉ. होसाळीकर यांचे स्पष्ट वक्तव्य

Dr. Hosalikar ; परतीचा पाऊस कसा राहिल डॉ. होसाळीकर यांचे स्पष्ट वक्तव्य

Dr. Hosalikar ; पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांनी सप्टेंबर मध्ये पावसाचा अंदाज तसेच परतीचा पाऊस कसा राहिल याबाबत स्पष्ट अंदाज व्यक्त केला आहे. लवकरच खरिपातील सोयाबीन, उडिद यासारखे पिके काढणीला येत असून पिक काढणी दरम्यान हवामान कसे असेल याबाबत शेतकऱ्यांना माहिती असते आवश्यक असते तरी होसाळीकर यांनी काय अंदाज व्यक्त केला पाहुया सविस्तर..

 

हे वाचा – रामचंद्र साबळे ; या आठवड्यात पावसाचा अंदाज ; परतीचा मान्सून अंदाज

 

डॉ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या अंदाजानुसार परतीचा पाऊस सप्टेंबर च्या शेवटच्या आठवड्यात सुरू होतो परंतु अद्याप भारतीय हवामान विभागाने राजस्थान मधुन परतीचा पाऊस कधी सुरू होणार याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. भारतीय हवामान खात्याने राजस्थान मधुन मान्सूनचा परतीचा प्रवास कधी सुरू होईल हे आधी कळवले जाईल व त्यानंतर आपल्या महाराष्ट्राबद्दल अंदाज लावता येईल असे होसाळीकर म्हणाले.

 

होसाळीकर म्हणतात कि सप्टेंबर मध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस होत असतो तरी शेतकऱ्यांनी दुपारपर्यंत शेतात काम करुन दुपारनंतर शेतातील ईतर कामे जि घरबसल्या करता आली तर करावी म्हणजे वारे, विजेपासून सुरक्षा करता येईल. तसेच पाऊस सुरू होताच पाळीव प्राणी आणि स्वतः सुरक्षित ठिकाणी रहावे असे सांगितले आहे.

 

हे वाचा – प्रधानमंत्री मानधन योजना ; शेतकऱ्यांना दरमहा 3000 रुपये मिळणार

 

अनेक हवामान तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबर च्या तिसऱ्या आठवड्यात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे तरी कमी दाबाच्या प्रभावामुळे मान्सूनचा परतीचा प्रवास लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. तसेच ला निनाच्या प्रभावामुळे सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडणार आहे पण होसाळीकर यांनी याबाबत काहीही स्पष्ट सांगितले नाही.

 

देशात मान्सूनचे आगमन जुन मध्ये तर परतीचा प्रवास राजस्थान मधुन सप्टेंबर मध्ये सुरू होतो. यंदा भारतीय हवामान विभागाने परतीच्या मान्सुनबद्दल कोणतीही घोषणा केली नाही. जेव्हा मान्सूनचा परतीचा प्रवास राजस्थान मधुन सुरू होईल त्यानंतर महाराष्ट्रातून कधी निघून जाणार याचा अंदाज हवामान विभागाकडून जाहीर करण्यात येईल असे होसाळीकर यांनी सांगितले आहे.

 

हे वाचा – पंजाबराव डख म्हणतात या तारखेपासून पाऊस उघडणार पहा नवीन अंदाज

होसाळीकर यांनी मान्सूनचा परतीचा प्रवास कधी सुरू होणार आणि महाराष्ट्रातून कधी निघून जाणार याबाबत कोणतीही माहिती दिली नाही अधिक माहिती खालील YouTube video मध्ये पहा..

 

Leave a Comment

Close Visit hello.maharashtra-live