नुकसान भरपाई ; या शेतकऱ्यांना मिळणार 40 हजार रुपयांपर्यंत मदत…

नुकसान भरपाई ; या शेतकऱ्यांना मिळणार 40 हजार रुपयांपर्यंत मदत…

नुकसान भरपाई ; राज्यात ऑगस्ट च्या शेवटी आणि सप्टेंबर च्या सुरुवातीला राज्यात अनेक भागात अतिवृष्टी झाली. मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली, नांदेड यासह परीसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. अचानक ढगफुटी सदृश्य पाऊस आल्याने नदीकाठच्या गावात पाणी पुराचे पाणी शिरले त्यामुळे शेती, घरे, जनावरे वाहुन गेले. या नुकसानीची भरपाई देण्यासाठी पंचनामे सुरू आहेत.

राज्य सरकारने NDRF च्या निकषांच्या बाहेर जाऊन मदत देण्याचे जाहीर केले आहे. कोरडवाहू पिकांसाठी हेक्टरी 13600 रूपये मदत तीन हेक्टर च्या मर्यादेत शेतकऱ्यांना मिळणार आहे. यापुर्वी सरकार कोरडवाहू पिकांसाठी 8500 रूपये दोन हेक्टरच्या मर्यादेत देत होते. आता या निकषांत बदल होऊन हेक्टरी 13600 रूपये तीन हेक्टरच्या मर्यादेत नुकसान भरपाई मिळणार आहे.

शेतकऱ्यांना 40 हजारापर्यंत नुकसान भरपाई मिळणार कशी…

सरकार एनडीआरएफ च्या निकषांच्या बाहेर जाऊन हेक्टरी 13600 रूपये तीन हेक्टरच्या मर्यादेत देण्याचे जाहीर केले आहे. जर एखाद्या शेतकऱ्यांकडे तीन हेक्टर क्षेत्र असेल तर त्या शेतकऱ्यांना 40 हजार 800 रूपये मदत मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे कोरडवाहू शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नुकसान भरपाई

बागायत आणि बहुवार्षिक पिकांसाठी किती मदत मिळणार ?

सरकारने जिरायत पिकांसाठी 13600 रूपये हेक्टर तीन हेक्टर मर्यादेत मदत जाहीर केली पण बागायती पिकांसाठी आणि बहुवार्षिक पिकांसाठी अद्याप कोणतीही मदत जाहीर केली नाही. अनेक ठिकाणी बागायती पिके आणि बहुवार्षिक पिकांचे नुकसान झाले तरी यात शेतकऱ्यांना वाढीव मदत मिळणार की पुर्वीच्या निकषांआधारे मदत मिळणार हे पाहण्यासारखे आहे.

 

नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी या उद्देशाने तीन हेक्टर मर्यादेत हेक्टरी 13600 रूपये जिरायती पिकांसाठी मदत शासनाने जाहीर केली आहे. याबाबत ट्विट करून महाराष्ट्र शासन हि माहिती शेअर केली आहे.

हि माहिती इतर शेतकऱ्यांना शेअर करा तसेच महत्त्वाच्या बातम्या, शेतीविषयक शासकीय निर्णय, बाजारभाव, हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या whatsaap ग्रुपमध्ये सामिल व्हा. धन्यवाद…

 

Leave a Comment

Close Visit hello.maharashtra-live