Mtskpy ; मागेल त्याला सौर कृषी पंप कृषी योजना सुरू…

Mtskpy ; मागेल त्याला सौर कृषी पंप कृषी योजना सुरू…

Mtskpy ; शेतकऱ्यांची सर्वात मागणी असलेल्या सोलार पंपासाठी (मागेल त्याला सोलार पंप) हि योजना आज दि. 13/सप्टेंबर 2024 रोजी सुरू करण्यात आली आहे. सोलार पंपासाठी आपल्या महाराष्ट्रात सर्वात जास्त मागणी आहे. लवकरच या योजनेअंतर्गत अर्ज सुरू होतील व या योजनेअंतर्गत आठ लाख सोलार पंपाचे वितरण केले जाणार आहे.

मागेल त्याला सौर कृषी पंप कृषी योजना सुरू

राज्य सरकारने अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेप्रमाणे मागेल त्याला सोलार पंप योजना (Mtskpy) सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याचे अवाहन केले जाईल तरी अर्ज सुरु होताच शेतकऱ्यांनी तातडीने अर्ज सादर करावेत. मागेल त्याला सोलार पंप योजनेचा लाभ आतापर्यंत कोणत्याही योजनेअंतर्गत सोलार पंपाचा लाभ न घेतलेल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे.

 

या शेतकऱ्यांना मागेल त्याला सोलार पंप योजनेचा लाभ मिळणार नाही

तुम्ही कुसुम सोलार पंप, मुख्यमंत्री सौर कृषी पंप आणि महावितरणच्या माध्यमातून सोलार पंपाचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला मागेल त्याला सोलार पंप योजनेचा लाभ मिळणार नाही.

मागेल त्याला सोलार पंप (Mtskpy) साठी ऑनलाईन कसा करावा याबाबत संपूर्ण माहिती दिली जाईल. तरी तुम्ही आमच्या whatsaap ग्रुप मध्ये सामील व्हा येथे तुम्हाला शेतीविषयक नवनवीन माहिती भेटत राहते… धन्यवाद

 

Leave a Comment

Close Visit hello.maharashtra-live