Monsoon news ; मान्सूनचा परतीचा प्रवास या तारखेपासून सुरू होणार – हवामान विभागाने दिली माहिती

Monsoon news ; मान्सूनचा परतीचा प्रवास या तारखेपासून सुरू होणार – हवामान विभागाने दिली माहिती

 

Monsoon news ; राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. राज्याच्या काही भागांत सरी पडत असल्या तरी अनेक भागांत मुसळधार पाऊस ओसरला आहे. मान्सूनचा परतीचा प्रवास 19 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर या कालावधीत होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.

 

यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने मे महिन्यात वर्तवला होता. अंदमान निकोबार बेटांवर वेळेआधीच दाखल झालेल्या मान्सूनने यंदा चांगला पाऊस दिला. महाराष्ट्रासह देशातील अनेक भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे राज्यातील धरणांमध्ये चांगला पाणीसाठा निर्माण झाला आहे. काही धरणे ओसंडून वाहत असल्याने यंदा पाण्याचा प्रश्नही सुटला आहे. शेतीलाही यंदा मुबलक पाणी मिळणार आहे. साधारणपणे, मान्सूनचा परतीचा प्रवास दरवर्षी 17 सप्टेंबरच्या आसपास सुरू होतो आणि 15 ऑक्टोबरपर्यंत देशभरात परततो. मात्र यंदा मान्सूनचा परतीचा प्रवास दोन दिवसांनी लांबणार आहे.

 

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, वायव्य भारतातील काही भागांतून नैऋत्य मान्सून परतण्यासाठी पुढील आठवड्यात अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे 19 ते 25 सप्टेंबर दरम्यान मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे.सध्या सक्रीय असलेल्या ला नीनाच्या प्रभावामुळे सप्टेंबरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. आजपासून महाराष्ट्राच्या विविध भागात पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र त्यानंतर राज्यात काही ठिकाणी रिमझिम पावसाची शक्यता आहे. 27 सप्टेंबरपासून पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

 

 

पुढील तीन दिवस राज्यात पावसाची उघडीप राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. त्यानंतर सोमवारपासून पावसाला सुरुवात होईल. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसह पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशीम, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, धुळे येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे.

 

Leave a Comment

Close Visit hello.maharashtra-live