Nuksaan bharpaai ; या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सततच्या पावसाचे अनुदान मिळणार…
Nuksaan bharpaai ; राज्यात 2022 मध्ये सततच्या पावसामुळे शेती पिकाचे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने विभागिय आयुक्तांनी केलेल्या मागणीनुसार 1500 कोटी रुपये जिल्हानिहाय वाटपास मंजुरी दिली होती. आणि ज्या जिल्ह्यांना अतिरिक्त निधीची आवश्यकता असेल अशा जिल्ह्यांनी संबंधित तहसील कार्यालयाकडून लाभार्थ्यांची डीबीटी प्रणाली द्वारे माहिती 28/02/2024 पर्यंत भरून घ्यावी अशा सुचना दिल्या होत्या.
सततच्या पावसाचे अनुदान 2022 याबाबत शासन निर्णय येथे पहा.
त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी परभणी, वाशिम, अमरावती, अहमदनगर यांच्या कडून अतिरिक्त निधीची मागणी करण्यात आली होती. तरी दि. 10/सप्टेंबर रोजी निधी वितरणचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
शासन निर्णयानुसार परभणी, अमरावती, वाशिम, अहमदनगर या जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना 2022 चे सततच्या पावसाचे अनुदान मिळाले नाही अशा शेतकऱ्यांना 61 कोटी 16 लाख रुपयांचा निधी वितरणास मंजुरी देण्यात आली आहे. हे अनुदान फक्त 2022 मध्ये ज्या शेतकऱ्यांना सततच्या पावसाचे अनुदान मिळाले नाही अशा शेतकऱ्यांना मिळणार आहे.
सततच्या पावसाचे अनुदान 2022 याबाबत शासन निर्णय येथे पहा.