Onion big news ; आठवडाभरात कांद्याचे दर सत्तरी गाठणार – बाजार अभ्यासक…

Onion big news ; आठवडाभरात कांद्याचे दर सत्तरी गाठणार – बाजार अभ्यासक…

Onion big news ; राज्यात अती मुसळधार पावसामुळे कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे नवीन कांदा ऑक्टोबर मध्ये बाजारात येईल त्यामुळे कांद्याचे बाजार ठोक बाजारात 50 रूपये तर किरकोळ 70 पार होण्याची शक्यता मुंबई Mpsc चे संचालक व व्यापारी अशोक वाळुंज यांनी दिली आहे.

 

सध्या किरकोळ बाजारात कांद्याचे दर 50 रुपये किलो पर्यंत गेले आहेत व येत्या आठवड्यात कांद्याचे दर 70 पार होणार असल्याचे संकेत आहेत. कांद्याचे दर सावरल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. नवीन कांदा बाजारात येण्यासाठी अजून दोन महिण्याचा अवधी आहे तसेच अनेक भागात अतिवृष्टी झाल्याने कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. Onion big news  त्यामुळे नवीन कांदा बाजारात किती प्रमाणात येईल याबाबत स्पष्ट झाले नाही तरी वाढलेले कांद्याचे दर ऑक्टोबर मध्ये काहिसे कमी होतील असे मुंबईचे व्यापारी अशोक वाळुंज यांनी सांगितले आहे.

 

नाफेडचा कांदा मुंबई बाजारात दाखल..

केंद्र सरकारने नाफेड मार्फत खरेदी केलेला कांदा मुंबई आणि मुंबई उपनगर मध्ये नागरिकांना खरेदी साठी उपलब्ध करून दिला आहे. नाफेडचा कांदा नागरिकांना 35 रूपये प्रति किलो या दराने मिळणार आहे. नाफेडचा कांदा मुंबई बाजारात आल्याने बाजारावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

नाफेडचा कांदा एक किलोच्या पॅकिंग मध्ये व्हॅन च्या माध्यमातून नागरिकांना पर्यंत पोहचवला जात आहे. परंतु नाफेडचा कांद्याची जास्त विक्री होणार नसल्याचे अशोक वाळुंज यांनी सांगितले आहे.

 

Onion big news

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आनंदाची बातमी

गेल्या वर्षी अनेक ठिकाणी दुष्काळाचा तडाखा बसला असल्याने उन्हाळी कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटले होते. त्यामुळे सध्या पासून कांद्याचे दर चांगले आहेत येत्या आठवड्यात कांद्याचे दर किलोमागे 20 रूपयांनी वाढतील असा अंदाज मुंबईचे एमपीएससी चे संचालक आणि व्यापारी अशोक वाळुंज यांनी सांगितले आहे. Onion big news

 

कांद्याचे दर यंदा चांगले आहे हि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे. गेल्या काही वर्षांपासून कांदा उत्पादक शेतकरी सतत तोट्यात आहे. तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे कांद्याचे मोठे नुकसान होत आहे. दररोजचे कांद्याचे बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या whatsaap group मध्ये सामील व्हा..

Leave a Comment

Close Visit hello.maharashtra-live