Panjab dakh live ; शेतकऱ्यांना खुशखबरः या तारखेपासून पाऊस उघडणार

Panjab dakh live ; शेतकऱ्यांना खुशखबरः या तारखेपासून पाऊस उघडणार… 

 

Panjab dakh live ; हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी आज दि. 07/सप्टेंबर रोजी नवीन अंदाज वर्तवला आहे. या अंदाजानुसार त्यांनी शेतकऱ्यांना खुशखबरः दिली आहे. राज्यातील पाऊस लवकरच विश्रांती घेणार असल्याचे सांगत त्यांनी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. पाहुया पंजाबराव डख यांचा सविस्तर हवामान अंदाज..

मराठवाडा विदर्भात तसेच पश्चिम महाराष्ट्रात या दरम्यान पाऊस… 

डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार दि. 07/सप्टेंबर ते 09/सप्टेंबर दरम्यान उत्तर पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात भाग बदलत पावसाचा अंदाज आहे. तसेच 08/सप्टेंबर ते 15/सप्टेंबर दरम्यान अमरावती, अकोला, नागपूर, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, जालना, परभणी, बीड, संभाजीनगर आणि जळगाव या जिल्ह्यात दुपारनंतर जोरदार पावसाचा अंदाज आहे.

 

दि. 12/सप्टेंबर ते 14/सप्टेंबर दरम्यान या भागात जोरदार.. 

पंजाबराव डख म्हणतात दि. 12/सप्टेंबर ते 14/सप्टेंबर दरम्यान अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, परभणी, जालना, संभाजीनगर आणि जळगाव या जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तरी शेतकऱ्यांनी सतर्क रहावे.

 

10/सप्टेंबर नंतर या भागात पाऊस उघडणार… 

पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार दि. 10/सप्टेंबर नंतर पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यातील पावसाचा जोर कमी होणार आहे. तरी दुपारनंतर स्थानिक वातावरण निर्माण होऊन हलक्या सरी येवू शकतात. (पंजाबराव डख)

 

हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार एकंदरीत परीस्थिती नुसार 15/सप्टेंबर नंतर राज्यातील पाऊस विश्रांती घेणार आहे तरी शेतकऱ्यांना सोयाबीन काढणीसाठी अनुकूल परिस्थिती असेल. पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजाचा YouTube video खाली पहा..

 

 

Leave a Comment

Close Visit hello.maharashtra-live