Soyabin news ; केंद्र सरकारकडून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा…

Soyabin news ; केंद्र सरकारकडून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा…

Soyabin news ; सध्या सोयाबीनच्या दरवाढीबाबत अनेक राज्यात आंदोलन सुरू आहे राजस्थान, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात शेतकऱ्यांकडून मोर्चे, आंदोलन, निदर्शने करत सोयाबीनला किमान 6000 रूपये प्रति क्विंटल दराची मागणी केली जात आहे. केंद्रीय कृषिमंत्री असलेल्या मध्यप्रदेश येथे मोठ्या व्याप्तीसह सोयाबीनला 6000 रूपये दर मिळावा अशी मागणी केली जात आहे. मध्यप्रदेश मध्ये शेतकऱ्यांकडून (तु रहेगा मौन तो तेरी सुनेगा कौन) अशी घोषणा देत आंदोलन सुरू आहे.

 

गेल्या हंगामापासून सोयाबीनचे बाजारभाव खुपच घसरले आहेत. उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतकऱ्यांना काहितरी नफा शिल्लक राहण्यासाठी 6000 रूपये क्विंटल च्या पुढे बाजारभाव मिळणे गरजेचे आहे परंतु एक वर्षभरापासून सोयाबीन 4000 ते 4200 रूपये क्विंटल च्या दरम्यान शेतकऱ्यांना विकावे लागत आहे. सोयाबीनच्या पडलेल्या बाजार भावामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.

केंद्र सरकारकडून आज महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यात नाफेड तसेच NCCF च्या माध्यमातून हमिभावाने म्हणजेच 4892 रूपयांने सोयाबीन खरेदीच्या सुचना दिल्या आहेत. सध्या सुरू असलेली सोयाबीन उत्पादकांची लुट थांबून किमान हमीभाव तरी शेतकऱ्यांना मिळेल या निर्णयामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना काहिसा दिलासा मिळाला आहे.

 

केंद्र सरकारकडून महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा या तीन राज्यातील सोयाबीन हमिभावाने खरेदीच्या सुचना दिल्या आहेत मध्यप्रदेश आणि राजस्थान बद्दल अद्याप कोणतीही सुचना दिलेली नाही. या दोन राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांबाबत लवकरच केंद्र सरकारकडून काहीतरी निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा आहे.

सध्या राज्यातील शेतकऱ्यांना ई समृद्धी पोर्टलवर आपल्या सोयाबीनची हमिभावाने विक्री करण्यासाठी नोंदणी सुरू आहे तरी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचे सोयाबीन पहिल्या टप्प्यात हमिभावाने खरेदी केले जाईल तरी लवकर तुम्ही हमिभावाने विक्री करण्यासाठी नोंदणी पुर्ण करावी.

खरीप हंगामातील पिकांच्या हमीभावाच्या विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू आधिक माहिती येथे पहा 

 

ई-समृद्धी पोर्टल नोंदणी ; खरीप हंगामातील पिकांच्या हमीभावाच्या विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू

 

Leave a Comment

Close Visit hello.maharashtra-live