रामचंद्र साबळे ; या आठवड्यात पावसाचा अंदाज ; परतीचा मान्सून अंदाज…
रामचंद्र साबळे ; महाराष्ट्रावर आज आणि उद्या (दि.08/,09/ सप्टेंबर) रोजी 1006 हेक्टापास्कल एवढा हवेचा दाब राहील. त्यामुळे हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता राहील. दि.11/ ते 13/ सप्टेंबर पर्यंत हवेचे दाब 1004 ते 1006 हेप्टापास्कल इतके राहतील. त्या वेळी मध्यम स्वरूपातील पावसाचे प्रमाण अधिक राहील. दि. 13/,14/ सप्टेंबर दरम्यान हवेच्या दाबात वाढ होईल व पावसाचे प्रमाण हलक्या स्वरूपात वाढण्याची शक्यता आहे. (रामचंद्र साबळे हवामान अंदाज)
कोकणात मध्यम स्वरूपात, उत्तर महाराष्ट्रात नाशिक व धुळे येथे हलक्या, तर नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता राहील. मराठवाड्यात धाराशिव, बीड या जिल्ह्यांत हलक्या, तर लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे. पश्चिम विदर्भ, मध्य विदर्भ व पूर्व विदर्भात या आठवड्यात मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात अत्यंत हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता राहिल असा अंदाज जेष्ठ हवामान तज्ञ रामचंद्र साबळे यांनी वर्तवला आहे.
कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील भंडारा, गोंदिया व पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. म्हणजेच नैर्ऋत्य मॉन्सून या आठवड्यातही सक्रिय राहील. विदर्भात वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. धाराशिव, बीड, नगर, सोलापूर, सांगली या जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग 21 ते 24 कि.मी. राहील. आकाश अंशतः ढगाळ राहण्यामुळे काही काळ पावसात उघडीप व सूर्यप्रकाश राहील.
परतीचा मॉन्सून सुरू होण्यास वेळ लागेल. कारण दि. 13/ सप्टेंबर पर्यंत राजस्थानवरील तापमान कमी राहण्यामुळे हवेचे दाब 1000 हेप्टापास्कल इतके कमी राहील. त्यामुळे तेथे पाऊस सुरूच राहील. जोपर्यंत राजस्थानमध्ये पाऊस थांबत नाही व हवेच्या दाबात वाढ होत नाही, तोवर ईशान्य मॉन्सून सुरू होणार नाही असे रामचंद्र साबळे यांनी सांगितले आहे.