सोयाबीन कापूस अनुदान ; कापूस सोयाबीन अनुदानाचा 100% निधी वितरणास मंजुरी

सोयाबीन कापूस अनुदान ; कापूस सोयाबीन अनुदानाचा 100% निधी वितरणास मंजुरी

सोयाबीन कापूस अनुदान ; गेल्या हंगामात पडलेल्या बाजारभावामुळे तसेच दुष्काळामुळे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटांना सामोरे जावे लागले होते या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी भावांतर योजनेची घोषणा केली व नंतर दोन हेक्टर मर्यादेत हेक्टरी 5000 देण्याचे जाहीर केले. या अनुदान वितरण प्रणाली साठी एक स्वतंत्र पोर्टल विकसित केले तसेच शेतकऱ्यांना आधार संबंधित डाटा वापरण्याचे सहमती पत्र व अर्ज भरून घेतले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कापूस आणि सोयाबीन चे अनुदान 21/ऑगस्ट रोजी वितरणाला सुरू होईल तर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी 10/सप्टेंबर रोजी अनुदान वितरण सुरू होईल असे सांगितले होते पण या दोन्ही तारखांना अनुदान वितरण सुरू झालेले नाही. परंतु राज्य सरकारने दि. 13/सप्टेंबर रोजी कापूस सोयाबीन अनुदानाचा 100% निधी वितरणास मंजुरी दिली आहे. त्यामुळे अनुदान वितरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

कापूस सोयाबीन अनुदाचा 100% निधी वितरणास मंजुरी

सोयाबीन कापूस अनुदान अनुदान च्या एकुण निधी पैकी 60% निधी मंजूर केला होता आणि दि. 13आतापर्यंत माहिती भरलेल्या 13/सप्टेंबर रोजी उर्वरित 40% निधी वितरणास मंजुरी दिली आहे. आता 100% निधी वितरणास मंजुरी मिळाल्याने जसजसे शेतकरी अनुदानासाठी पात्र होतील तसतसे शेतकऱ्यांच्या आधार लिंक खात्यात अनुदान जमा होईल.

 

कापूस आणि सोयाबीन अनुदान वाटपाबाबत पुढे काही नवीन माहिती मिळाली तर आम्ही तुमच्या पर्यंत नक्की पोहचवण्याचा पर्यंत करु तरी शेतीविषयक नवनवीन माहिती, हवामान अंदाज, बाजारभाव, शेती सल्ला व इतर महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या whatsaap ग्रुपमध्ये सामिल व्हा.. धन्यवाद

 

 

Leave a Comment

Close Visit hello.maharashtra-live