पंजाबराव डख ; पाऊस उघडला मात्र या तारखेपासून पुन्हा पावसाचा इशारा…

पंजाबराव डख ; पाऊस उघडला मात्र या तारखेपासून पुन्हा पावसाचा इशारा…

पंजाबराव डख ; मराठवाड्यातील प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी नवा अंदाज वर्तवला आहे. या अंदाजात त्यांनी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना येत्या आठवडाभरात हवामान कसे राहील, पावसाची उघडीप किती दिवस राहील याची माहिती दिली आहे. पंजाबराव डख यांचा सविस्तर हवामान अंदाज पहा.

पंजाबराव डख म्हणतात आज 13/सप्टेंबरपर्यंत उत्तर महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपात भाग बदलत पाऊस पडेल आणि 13/सप्टेंबरपासून राज्यात पाऊस विश्रांती घेईल मात्र ज्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनची काढणी झाली आहे त्यांनी काढणीला सुरुवात करावी आणि ताबडतोब गोळा करून झाकून ठेवावे. (Panjab dakh live)

किती दिवस पावसात उघडीप – पंजाबराव डख

हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांच्या मते, राज्यात 13/सप्टेंबरपासून पावसात उघडीप राहिल आणि कडक ऊनही असेल, तरी सोयाबीन काढणीसाठी अनुकूल परिस्थिती राहिल ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन काढणीला आले त्यांनी काढणीला सुरुवात करावी. तसेच 20/सप्टेंबरपासून पुन्हा पाऊस पडेल तरी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी हे लक्षात घेऊन सोयाबीन काढणीचे नियोजन करावे. (Havaman aandaj today panjab dakh live)

अनेक ठिकाणी लवकर पेरणी झाली असून त्या भागातील सोयाबीन काढणीला आले आहे. 13 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर या कालावधीत सोयाबीन काढणीसाठी अनुकूल परिस्थिती असली तरी या आठ दिवसांत शेतकऱ्यांनी सोयाबीनची काढणी करून झाकुण ठेवावे, असे पंजाबराव डख यांनी सांगितले. (Panjab dakh havaman aandaj today)

पंजाबराव डख यांनी पुढे दसऱ्याला पुन्हा पाऊस येईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. सोयाबीन काढणीच्या काळात पाऊस झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान तसेच धावपळ होत असते, त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज घेऊन नंतर सोयाबीन काढणीला सुरुवात करावी. पंजाबराव डख यांचा YouTube व्हिडिओ पहा आणि दररोज हवामान अंदाजासाठी आमच्या whatsapp ग्रुपमध्ये सामील व्हा.

 

Leave a Comment

Close Visit hello.maharashtra-live