रविकांत तुपकर आणि अजित पवार यांची बैठक पुर्ण अंतीम निर्णय पहा…
रविकांत तुपकर ; शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी राजमाता जिजाऊ यांच्या सिंदखेड येथील राजवाड्यासमोर अन्नत्याग आंदोलन केले होते. त्यांच्या आंदोलनाला प्रतीसाद देत राज्य सरकारने शिष्टमंडळासह उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि शेतकरी नेते रविकांत तुपकर व काही शेतकरी यांच्यात आज दि. 11/सप्टेंबर रोजी मुंबई येथे बैठक पार पडली आहे. या बैठकीत काय चर्चा व रविकांत तुपकर यांची काय प्रतिक्रिया दिली याबाबत माहिती पाहुया.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यात बैठक पार पडल्यानंतर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला बैठकीत काही प्रश्नावर सरकार सकारात्मक असल्याचे तुपकर यांनी सांगितले तसेच कर्जमाफी बाबतीत सरकार सकारात्मक नसल्याचे तुपकर यांनी सांगितले आहे.
1) रविकांत तुपकर म्हणाले की कापूस आणि सोयाबीन प्रश्नावर राज्य सरकारचे शिष्टमंडळ केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करून तोडगा काढणार असल्याचे तुपकर यांनी सांगितले.
2) पिकविमा कंपनीने शेतकऱ्यांना वेळेवर पिकविमा न दिल्यामुळे शेतकऱ्यांना कर्जासह पिकविमा दिला जाईल व विमा कंपनीवर कारवाई केली जाईल असे पवार यांनी आश्वासन दिल्याचे तुपकर यांनी सांगितले आहे.
3) अतिवृष्टीची नुकसान भरपाई आचारसंहिता लागू होण्याआधी शेतकऱ्यांना मिळणार असे पवार यांनी सांगितले.
4) केंद्र सरकारकडे घरकुल तसेच विविध अनुदान थकलेले आहे तरी हे अनुदान तात्काळ वाटपाचे आश्वासन पवार यांनी दिले.
5) ज्या शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन अनुदान मिळेल व त्या शेतकऱ्यांसाठी निधी उपलब्ध करून देऊ असे अजित पवार यांनी सांगितले.
6) शेतकऱ्यांना पिक कर्ज हे पेरणी आधी द्यावे या मागणीवर पवार यांनी लवकरच मिटिंग लावतो असे सांगितले.
या बैठकीत झालेल्या चर्चेवर रविकांत तुपकर म्हणाले की काही अंशी सकारात्मक बैठक झाली असली तरी जोपर्यंत 100% रिझल्ट येणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरू ठेवणार असे रविकांत तुपकर यांनी सांगितले. तसेच पुढे आंदोलन कसे असेल याबाबत लवकरच चर्चा करून कळवले जाईल.
दररोजचे बाजारभाव, शेतकरी योजना,महत्वाचे शेती बाबतीत शासन निर्णय, मंत्रीमंडळ निर्णय, हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या whatsaap ग्रुपमध्ये सामिल व्हा. आणि आपल्या शेतकरी मित्रांना हि माहिती नक्की शेअर करा.